Ads
मनोरंजन

खिलाडी अक्षयला मिळाले खास बर्थडे गिफ्ट; ‘पृथ्वीराज’चा टीझर रिलीज

Prithviraj Chauhan
डेस्क desk team

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त अक्षयला एक गिफ्ट मिळालय अस म्हणावं लागेल. कारण यशराज फिल्म्सने अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. अक्षयने ही हा टीझर सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

“माझ्या वाढदिवासाच्या दिनी माझ्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमाचा टीझर शेअर करताना आनंद होत आहे. माझी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी निवड केल्याबद्दल मनापासून आभार. माझ्या करिअरमधील मोठ्या चित्रपटांपैकी पृथ्वीराज चौहान हा एक आहे असे अक्षयने सांगितले.

 

हा चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे.‘पृथ्वीराज’ चित्रपट दिवाळी 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. तत्पूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर मधून पृथ्वीराज या मुख्य भुमिकेतील लुक गुप्त ठेवण्यात आला आहे. तसेच अक्षय याचा चेहरा सुद्धा टीझरमधून दाखवण्यात आलेला नाही.

‘मिशन मंगल’ चित्रपट हिट झाल्यानंतर अक्षय कुमार आता कोणता नवा चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. आणि आज ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. आणि टीजर पाहून चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचलीय.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: