दोन दिवसांपासू सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक अक्षरशाह कोलमडले आहे. अशात आज गणेशोत्सवाचा चौथा दिवस, आज जेष्ठ गौरी आवाहन असून कोकणात जाणाऱ्या अनेक ट्रेन या उशीराने धावत आहेत. यामुळे संतप्त झालेले काही प्रवासी हे थेट मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाच्या रुळावर आंदोलनासाठी उतरले होते. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
गाड्या उशिरा
मंगळवार पासून कोकणासह मुंबईत पावसाने अक्षरशाह थैमान घातले. यामुळे बुधवारी मुंबई वरुन कोकणात जाणाऱ्या अनेक गाडया पनवेल, रोहा इथपर्यंत धावुन पुढे रद्द झाल्या. गणेशात्सवा दरम्यान चार अतिरिक्त डब्बे लावून धावणारी तुतारी एक्सप्रेस काल रद्द करण्यात आली, तर आज उशीराने धावत आहे. त्यामुळे कोकणाच्या दिशेन जाण्यासाठी कालपासून प्रतिक्षेत असलेल्या अनेक प्रवाशांनी दादर स्थानकात गर्दी केली होती. मात्र आज पाऊस थांबला असून पाणी ओसरले असले तरी कोकणाच्या दिशेने जाणारी तुतारी एक्सप्रसे, दादर सावंतवाडी एक्सप्रेस या गाड्यास उशीराने धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
प्रवासी रुळावर
संतप्त झालेले २० ते २५ प्रवासी थेट रेल्वे रुळावर उतरले होते. यानंतर जीआरपीएफ, आरपीएफ, रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रवाशांशी संवाद साधत त्यांची मनधरणी केली. यानंतर प्रवासी शांत झाले आणि त्यांनी रुळ मोकळा करुन दिला. प्रवाशांच्या या उद्रेकाचा परिणाम स्वरुप दखल घेत रेल्वेने पुढील काही वेळातच कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या फलाटावर लावल्या.