आज शिक्षक दिन. या दिनानिमित क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांने आपले गुरुवर्य रमाकांत आचरेकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला. ही आठवण काढून तो भावूक झाला.
सचिनने त्यांच्यासोबतचा आपला एक जुना फोटो शेअर केला आहे. यात सचिनने लिहीलंय, ‘शिक्षक केवळ शिक्षणच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारी मूल्येही रुजवून जातात. आचरेकर सरांनी मला मैदानावर ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ शिकवला आणि आयुष्यातही सरळमार्गी चालण्याची शिकवण दिली. माझ्या आयुष्यातल्या त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी दिलेले धडे मला आजही मार्ग दाखवतात.
Teachers impart not just education but also values. Achrekar Sir taught me to play straight – on the field and in life.
I shall always remain grateful to him for his immeasurable contribution in my life.
His lessons continue to guide me today. #TeachersDay pic.twitter.com/kr6hYIVXwt— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 5, 2019
मुंबईच्या शिवाजी पार्क येथील अकादमी येथे रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.सचिन शिवाय विनोद कांबळी, प्रवीण अमरे, अजित आगरकर, रमेश पोवार हे खेळाडूही या अकादमीमधून घडलेत. रमाकांत आचरेकर यांना सन् 1990 मध्ये प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कार आणि 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.