दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी20 मालिकेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीय. या टीममध्ये फक्त एक बदल झाला आहे. भुवनेश्वर कुमार ऐवजी हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिकला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी विश्रांती दिली होती. भुवनेश्वर कुमार तसेच जसप्रीत बुमराह या दोघांना आराम देण्यात आलाय.
सर्वांना वाटत होत कि, एमएस धोनी मैदानात परतेल परंतु एमएस धोनीची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्याची निवड का करण्यात याबाबत नेमक काही सांगण्यात आल नाही.
दक्षिण आफ्रिका आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्वेन्टी-20 मालिकेपासून करेल. ही मालिका तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची असून पहिला सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये 15 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल. दुसरा टी20 सामना सप्टेंबरला मोहाली आणि तिसरा टी20 सामना 22 सप्टेंबरला बंगळूरु येथे होणार आहे. टी20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी मालिकला सुरुवात होईल.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.