म्हाडाकडून मुंबई राज्यभरात अनेक विभागीय मंडळात घरे बांधली जातात. मुंबईतील तुंगा पवई,विरारच्या बोळींज व कोकणात लवकरच सदनिका बांधण्यात येणार आहेत. यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत.
म्हाडा पवई येथील मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार येथील बोळींज मधील अल्प उत्पन्न गटासाठी ५२० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागवण्यात मान्यता देण्यात आली आहे.तसेच आता गिरणी कामगारांना म्हाडामार्फत विक्री करण्यात आलेल्या सदनिका ५ वर्षांनंतर विक्री करता येऊ शकणार, असे म्हडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले आहे. यापूर्वी १० वर्षांपर्यंत विक्री करता येत नव्हत्या. तसेच त्यांनी मोतीलाल नगर, पहाडी गोरेगावसारख्या विभागामध्ये म्हाडा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात घरे मिळतील, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस वसाहतीसाठी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या रत्नागिरी येथे पार पडलेल्या बैठकीत रत्नागिरीच्या पोलीस विभागाच्या जमिनीवरिल पोलीस वसाहतीच्या पुनर्विकास व पायाभूत सुविधांसाठी १५५ कोटी रुपांची मंजूरी देण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणासाठीही विशेष सदनिकांची घोषणा करण्यात आली आहे,
- चिपळूणमधील मौजे रावतळे येथे पहिल्या टप्प्यात ४१८ घरे-१७ दुकाने, दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात अल्प उत्पन्न गटासाठी २३२ घरे, ६० दुकाने बांधली जाणार
- दापोली येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी १६० घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ८० घरे, सभागृहासाठी ३७ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- सावंतवाडीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १५० घरे बांधली जाणार आहेत.