गणेश चतुर्थीला अवघे दिवस उरले असतानाच चाकरमान्यांना कोकणाची ओढ लागलीय. त्यातच गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता, कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.
210 फेऱ्या, 647 अतिरिक्त डबे
कोकण रेल्वे मार्गावर नियोजित रेलगाडयाबरोंबरच खास रेल्वे गाडया सुरु केल्या आहेत. यामध्ये 210 फेऱ्या या खास रेल्वे मार्गावर मारणार आहेत. तसेच या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाडयांना 647 अतिरिक्त डबेही जोडले गेले आहेत.
गाडी क्रमांक 12051/ 12052 दादर – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला 30 ऑगस्टपासून सावंतवाडी रेलस्थानकावर थांबा दिला आहे.
आरोग्य कक्ष
खेड, कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रथोमपचार सुविधा असेल. त्याशिवाय चिपळूण, रत्नागिरी, थिवी, वेर्णा, मडगाव, कारवार व उडुपी रेल्वे स्थानकावर आरोग्य कक्ष असेल. सप्टेंबर महिन्याच्या 2 ते 12 र्पयत हे कक्ष असेल.
सुरक्षेसाठी 204 जवान तैनात
कोकण रेल्वे महामंडळाच्या अन्य स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मुख्य रेल्वे स्थानकावर तैनात केले जाणार आहे. सुरक्षतेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे एकूण 204 जवान व होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहे.
हेल्पलाईन
व्टिवटर व अखिल भारतीय सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 हून येणाऱ्या संदेशाची त्वरीत दखल घेण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन केले गेले आहे.