दरवर्षी गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘पीओपी’ प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मूर्ती घरी आणण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले जाते. मात्र विसर्जनाच्या काही दिवसानंतर मूर्त्याची हानी व पर्यावरणाचा ऱ्हास करणार चित्र डोळ्यासमोर दिसते. त्यामुळे कुठतरी अशी आव्हान समाजात पोकळ ठरतात. मात्र एकीकडे अशाप्रकारे निसर्ग समुद्राचा ऱ्हास होत असतानाच, दुसरीकडे मात्र मुर्तीकार माळवी कुटुंबीय पर्यावरण पूरक मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांची तिसरी पिढी घडवतोय. या पिढीमुळेच आता गेली कित्येक वर्ष पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मुर्त्या बाजारात येणार आहेत. त्यामुळे या मुर्त्या घडवून पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या माळवी कुटुंबियांशी बातमीदारने खास बातचीत केली.
तिसरी पिढी कार्यरत
मुर्तीकार अभय माळवी हे मुळचे विरार पुर्वेच्या जांभुळ पाडा, खानिवडे येथील रहिवासी. वडील पुरुषोत्तम माळवी यांच्या कडुन त्यांनी हा मूर्ती कलेचा वारसा घेत, जवळपास 1980 साला पासून त्यांनी स्वत:हा मातीला आकार देऊन गणेशाच्या सुंदर आणि सुबक अशा मुर्त्या बनवायला सुरवात केली. खर तर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र कलेचा वारसा असल्याने ते हा जोडधंदा करतात. गणेशोत्सवाच्या साधारण तिन महिने आधीपासून ते मातीच्या मूर्ती बनवायला सुरवात करतात. दरवर्षी साधारण 80 ते 90 मातीच्या मूर्ती ते बनवतात.शाडुच्या मातीची एक मूर्ती साधारण 2 ते 3 फुटाची मूर्ती बनवायला कमीत कमी 2 दिवसांचा कालावधी लागतो. त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा आणि मुलगी त्यांना मदत करतात. त्यामुळे आता त्यांची तिसरी पिढी या कलेच्या क्षेत्रात आपले पाय रोवतेय.
पर्यावरण पुरक गणेशोत्सव
अनेक सामाजिक संस्था, सिने अभिनेते पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन करत असतात. गणेशोत्सव हा नात्यांच्या, संस्कृती जपणारा माणसांना माणसाशी जोडणारा उत्सव आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अनेक मूर्ती गणेशोत्सवाच्या काही दिवसानंतर अनेक तुटलेले भाग समुद्र किनारी पाहाणे हे खर तर काळजाचा लचका तोडणारे असते. तेव्हा बातमीदारच्या या सदरातुन पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच आवाहन आम्ही करु इच्छितो. पुढील सदरात पर्यावरण पुरक आरास कशी साकारावी या विषयी आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी वाचत राहा बातमीदार…..