गेल्या काही दिवसांपासून पावसांने घेतलेल्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात 28 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मागिल काही दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. पुढील 4 दिवस म्हणजेच 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या दरम्यान समुद्रात भरती येणार असून साधारण 4.90 उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरादार वारा असल्याने मच्छिमारांसह पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर त्याचबरोबर समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना ही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.एका बाजूला मान्सून पून्हा हजेरी लावणार आहे तर दुसरीकडे सोलापूर, बीड, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये तापामान कमालीचा वाढला आहे. यामुळे अहमदनगर, ओरंगाबाद इथे कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जात आहे.