व्हिएतनामची लोकप्रिय विमान सेवा कंपनी ‘वियतजेट एअरलाइन्स’ जी जगभरात बिकीनी एअरहोस्टेसमुळे ‘बिकीनी एअरलाइन्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही विमानसेवा आता भारतात सुरु होत आहे. त्यामुळे भारतीयांना त्याचा प्रवास अनुभवता येणार आहे.
भारतामधून थेट व्हिएतनामची सेवा सुरु करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर पासून ही सेवा सूरु होणार आहे. यामध्ये ‘वियतजेट एअर’ या कंपनीच्या मोबाइल अॅप्लिकेशनमधून ६ डिसेंबर २०१९ पासून २८ मार्च २०२० पर्यंतची तिकीटे खरेदी करता येणार आहेत.
वेळापत्रक
नवी दिल्लीवरुन ६ डिसेंबर २०१९ पासून दर आठवड्याला सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी हो-ची-मीन सिटीदरम्यान कंपनी चार फेऱ्या सुरु करणार आहे. तर हनोई ते नवी दिल्ली ही सेवा ७ डिसेंबर २०१९ पासून दर आठवड्याला मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी उपलब्ध असणार आहे.
हो-ची-मीन सिटीमधून निघणारे विमान संध्याकाळी सात वाजता उड्डाण करुन रात्री दहा वाजून ५० मिनिटांनी नवी दिल्ली विमानतळावर उतरेल. तर नवी दिल्लीवरुन उड्डाण करणारे विमान ११ वाजून ५० मिनिटांनी उड्डाण करुन हो-ची-मीन सिटीमध्ये पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी पोहचेल.