मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांची सकाळी 11.30 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीला सुरुवात होणार आहे. या चौकशीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
#Mumbai: Maharashtra Navnirman Sena (MNS) Chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate to appear before the agency, today. pic.twitter.com/Q7taHe21ZJ
— ANI (@ANI) August 22, 2019
आज मनसेच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्याची शक्यता असल्याने फोर्ट परिसरात 144 कलम जमावबंदी लागू करण्यात आले होते. तसेच मनसेच्या विविध नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचं ‘EDiot Hitler’ लिहिलेलं टी-शर्ट परिधान करून बाहेर पडल्याने त्यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याना देखील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात घेतले. तर मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Mumbai: Maharashtra NavNirman Sena (MNS) leader Sandeep Deshpande detained by police as a precautionary measure. MNS chief Raj Thackeray has been summoned by the Enforcement Directorate (ED) to appear before the agency, today. pic.twitter.com/4kIUATA6PK
— ANI (@ANI) August 22, 2019
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. या नोटीसीत राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीला सामोरे जावे लागणार होते. तसेच या प्रकरणात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी याचे सुपुत्र उन्मेष जोशी यांचीही चौकशी होणार आहे.