भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडला 5-0 असे पराभूत करून ऑलिम्पिक टेस्ट स्पर्धेच्या विजेते पदावर नाव कोरले. या विजयानंतर भारताचे लक्ष्य आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीकडे लागले आहे.
न्यूझीलंडला भारतीय संघाला रोखता आले नाही. यावर भारताकडून हरमनप्रीत सिंह याने सातव्या मिनिटाला पहिला गोल केला तर शमशेर सिंह याने 18 व्या, निलकांत शर्मा याने 22 व्या, गुरसाहिजजित सिंह याने 26 व्या आणि मनदीप सिंह याने 27 मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केले.
भारताचे लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीकडे लागले आहे. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत पात्रता स्पर्धा होणार आहे. ही पात्रता स्पर्धा या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. ऑलिम्पिक पात्रता पूर्वआधी हॉकी संघांना या ऑलिम्पिक टेस्ट सामन्यात खेळने बंधनकारक होते.