भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उद्यापासून भारत आपल्या टेस्ट चॅम्पियनशिप अभियानाला सुरुवात करणार आहेत. त्याआधीच भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसला आहे.
भारतीय संध्या स्विमिंग पूलमध्ये एन्जोय करताना दिसत आहे.यामध्ये विराट आणि रोहितने सोशल मीडियावर स्विमिंग पूलमधील एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये संपूर्ण टीम इंडिया शर्टलेस दिसत आहे. दरम्यान भारताच्या उद्याच्या मॅचपूर्वी कर्णधार विराट कोहली समोर प्लेइंग इलेव्हन बद्दल एक प्रश्न उभा ठाकलाय. अजिंक्य रहाणेला संधी द्यायची की रोहित शर्माला असा पेच प्रसंग आहे.
रोहितने अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये नाबाद अर्धशतक तर प्रॅक्टिस मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यात अजिंक्यलाही प्रॅक्टिस मॅचमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये सूर गवसला. अर्धशतकी खेळी करत त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. यामुळे अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा पैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.