Ads
बातम्या

विरारमध्ये चिमुकल्याच्या धाडसाने चोर अटकेत!

डेस्क desk team

विरारमध्ये एका अकरा वर्षीय मुलाने दाखवलेल्या धाडसाने चोराला पकडण्यात यश आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या चोराला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात मुलाच्या धाडसाचेही कौतुक होतेय.

विरारच्या पश्चिमेकडील एम बी इस्टेट परिसरात राहणाऱ्या महाडिक यांच्या घरात ही घटना घडली. काल मंगळवारी दुपारी दिव्या महाडिक या आपल्या मुलीला शाळेत सोडवायला गेल्या होत्या. या दरम्यान दिव्या यांचा मुलगा तनिष महाडिक घरी एकटाच होता. एकटा मुलगा असल्याचे पाहून एक चोरटा घरात घुसला. मुलाला धमकावून तो घरातील सोन्याचे दागिने घेऊन जात होता.यावेळी चोरट्याच्या हातात आईचा सोन्याचा हार पाहून तनिषने धाडस दाखवून आपल्या पेक्षा वयाने मोठ्या व ताकदीने दुप्पट असणाऱ्या चोरट्याशी भिडला. यावेळी चोरट्याच्या हातातील हार हिसकावून तनिषने आरडाओरडा सुरु केला.

तेवढ्यात दिव्या महाडिक या देखील घरी पोहोचल्या.त्यानंतर त्यांनीही चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने तेथून पळ काढला. त्यावेळी सोसायटीमधील नागरिकांनी मायलेकांचा आरडाओरडा एकूण चोराचा पकडले. त्याचे हात बांधून ठेवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान ११ वर्षाचा मुलगा तनिष महाडिक याने दाखवलेल्या धाडसामुळे एक चोरटा पोलिसांच्या अटकेत आला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: