भारत-वेस्ट इंडिज मध्ये आजपासून कसोटी तीन दिवसीय सराव सामन्याला सुरुवात होणार आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमरा चांगले प्रर्दशन करण्यासाठी उत्सुक असतील.तिसर्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने सावधगिरी म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु होण्यापूर्वी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.
चेतेश्वर पुजारा पुजारा सहा-सात महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळेल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. या फॉर्मेटमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळला होता. यावेळी सात सामन्यांत एक शतक आणि अर्धशतकांसह 23.61 च्या सरासरीने 307 धावा केल्या आहेत.कसोटीत गेल्या काही काळापासून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करु शकलेल्या अजिंक्य रहाणेसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे आणि सराव सामन्यात त्यालाही चांगली फलंदाजी करायला आवडेल.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर जसप्रीत बुमरा सराव सामन्यातून लय परत मिळण्यासाठी तयार असेल. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा आणि रिषभ पंत देखील धावा करण्यास उत्सुक असतील. रिषभसाठी हे अधिक महत्तपूर्ण ठरेल कारण वृद्धिमान साहाने भारताकडून अ सामन्यात दोन अर्धशतके झळकावले आहेत तसेच तो एक चांगला यष्टीरक्षक आहे. मयंक अग्रवालच कसोटीत डावाची सुरूवात करेल अशी शक्यता आहे. पण मयंक अग्रवालसोबत हनुमा विहारी आणि लोकेश राहुल यांच्यापैकी एकाची निवड केली जाईल.
सराव सामन्यात उत्तम कामगिरी करून वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि ईशांत शर्मासुद्धा संघ व्यवस्थापनाला प्रभावित करण्यासाठी उत्सुक असतील. भारताच्या फिरकी विभागाची सूत्रे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असू शकते.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मुहम्मद शमी, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी उमेश यादव आणि.