‘मिशन मंगल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ती प्रतिक्षा संपली असून चित्रपट रिलीज झालाय. इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळावर आपले उपग्रह पाठवण्यात यशस्वी ठरले होते. त्या मागील गोष्ट दिग्दर्शकांनी आपल्या नजरेतून नाट्यमय स्वरूपात मांडली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, कीर्ति कुल्हारी, निथ्या मेनन, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा आणि विक्रम गोखले अशा जबदस्त स्टारकास्टने काम केले आहे. ‘मिशन मंगल’चे दिग्दर्शन दिग्दर्शक जगत शक्ती यांनी केले आहे.
चित्रपटाची कथा
मिशन मंगल’ चित्रपटाचे कथानक मंगळ मोहिमेवर रेखाटण्यात आले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (इस्त्रो) १७०० हून अधिक शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर यांच्या बौद्धिक शौर्याला आणि प्रयत्नाला सलाम करणारा मिशन मंगल हा चित्रपट आहे. मिशन मंगल या मध्ये मुख्यत: मंगळयान मोहिमेच्या संबंधी असला तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यातील संघर्षही मिशन मंगल मध्ये दाखविण्यात आले आहे.
इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळावर आपले उपग्रह पाठवण्यात यशस्वी ठरले होते. त्या मागील गोष्ट दिग्दर्शकांनी आपल्या नजरेतून नाट्यमय स्वरूपात मांडली आहे. इस्त्रोची मंगळयान मोहिम कशी सुरू होते तसेच या मोहिमेची टिम कशी चालू होते. हे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. मंगळयान या विशेष मोहिमेमध्ये पाच वेगवेगळ्या संस्कृतीच्या महिला वैज्ञानिक कशाप्रकारे एकजुट होतात व रॉकेटची रचना करतात आणि हे अशक्य असणारे मिशन शक्य करून दाखवतात हे मनोरंजकपणे दिग्दर्शकांनी मांडला आहे. तसेच प्रत्येक अभिनेत्रीच्या व्यक्तिरेखा वेगळी दिसावी यासाठी अधिक प्रयत्न केले आहे.
चित्रपट का पहावा?
वैज्ञानिकांप्रमाणे चित्रपटात तारा शिंदे (विद्या बालन) एका सामान्य गुहिणी सारखी कामही करताना दिसते. एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्लई (निथ्या मेनन), नेहा सिद्दीकी (किर्ती कुल्हारी), परमेश्वर नायडू (शर्मन जोशी), अनंत अय्यर (एच.जी.दत्तात्रेय) या वैज्ञनिकांमधील वैज्ञानिक पुन्हा कसा जन्माला येतो याची मनोरंजक कहाणी हा सिनेमा मांडतोय. तर तर त्यांचा मॉम हा प्रकल्प कसा प्रत्यक्षात येतो? अवघ्या दोन वर्षात ही मोहिम कशी आकार घेते? या सगळ्याची उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक्त असाल ना? त्यासाठी मिशन मंगळ चित्रपट नक्की पाहा.