भारतीय क्रिकेट टीमने भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये सर्व खेळाडू भारतवासियांना 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.
#TeamIndia wishes everyone a very Happy Independence Day
Jai Hind 🇮🇳#IndependenceDay pic.twitter.com/z2Ji00T2l0
— BCCI (@BCCI) August 14, 2019
सदर व्हिडिओत टीम इंडिया देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतेय. यामध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यासह रविंद्र जडेजा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.
दरम्यान सध्या भारतीय टीम वेस्ट इंडिजमध्ये आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय टीमने देशवासियांना एकदिवसीय मालिका विजयाची भेट दिलीय. वेस्ट इंडिजविरुद्ध टी -20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकादेखील जिंकली. त्रिनिदाद येथे झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळविला. भारताने एकदिवसीय मालिका 2-0 अशी आपल्या नावे केली.
दोन टेस्ट सीरीज
- भारत वेस्ट इंडीज बरोबर दोन टेस्ट खेळणार आहे. यामध्ये पहिली टेस्ट 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान असेल.हा सामना एंटिगुआ स्टेडीयम रंगणार असून भारतीय वेळेनुसार आपल्याला संध्याकाळी 7:00 वाजता पाहायला मिळणार आहे.
- दूसरा टेस्ट सामना हा 30 ऑगस्ट ते 03 सप्टेंबरला जमैकाच्या स्टेडीयमवर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आपल्याला रात्री 8:00 वाजता पाहायला मिळणार आहे.