मराठी मालिकांमध्ये सुप्रसिद्ध मालिका असलेल्या भागो मोहन प्यारे मध्ये एक सुंदर अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.यामध्ये भुताची भुमिका साकारणार आहे. मात्र ही अभिनेत्री कोण आहे.याबद्दल जाणुन घेऊयात.
मराठी मालिकांमध्ये विविध विषयांच्या मालिका येत असतात व त्या चाहत्यांच्या मनावर स्थान मिळवत असतात. अतुल परचुरे, श्रुती मराठे, सुप्रिया पठारे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिका ह्यात मोडणारी आहे. आपल्या हलक्या फुलक्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी. तर आता पुन्हा एकदा या मालिका वेगळ्या रुपात आणि ढंगात नुकतीच भेटीस आली आहे. ‘जागो मोहन प्यारे’ मध्ये श्रुती मराठे परी रुपात मोहन सोबत असते, तसेच ‘भागो मोहन प्यारे’ मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रुपात एक सुंदरी अभिनेत्री दाखवली आहे.
‘भागो मोहन प्यारे’ मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत तर दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र, या दोघां व्यतिरिक्त मालिकेच्या प्रोमोज मधून मोहनच्या बायकोच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस अभिनेत्री कोण आहे? हा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे.
दरम्यान, सरिता मेंहदळे हिने टेलिव्हिजन आणि नाटक या माध्यमांमध्ये काम केले आहे. तसेच छोट्या पडद्यावरील दोन मालिकांमध्ये ती झळकली होती. तसेच अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘अर्धसत्य’ या नाटकात तिनं काम केलं होतं. आता ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेत सरिता मधुवंतीची भूमिका साकारते आहे. यात सरिता 150 वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे, आणि ते प्रेम तिला मोहनच्या रूपात सापडत. तर ते प्रेम मिळवण्यासाठी ती काय काय करणार हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.