हिंदू धर्मासाठी इतर महिन्यांपेक्षा श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला म्हणजेच २ ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरूवात झाली. नागपंचमी नंतर आता १४ ऑगस्टला महाराष्ट्र भर श्रावणी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. जेव्हा श्रावण महिन्यात लागोपाठ दोन दिवशी पौर्णिमा असते तेव्हा पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा साजरी केली जाते.
नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांसाठी महत्वाचा मानला जातो. श्रावणी पौर्णिमे दिवशी समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरा करतात. कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करत समुद्राप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच समुद्राची पुजा करण्याची सुद्धा प्रथा आहे. श्रावण महिना हा समुद्रातील माश्यांचा प्रजनन काळ असतो म्हणून मासेमारी थांबविली जाते. मात्र, नारळी पौर्णिमेनंतर कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात उतरवून मासेमारी करण्यास सुरूवात करतात.
मुहूर्त
यावर्षी नारळी पौर्णिमा १४ ऑगस्ट रोजी आहे. तर यावेळी १४ ऑगस्ट दिवशी ३.४७ ते १५ ऑगस्ट दिवशी ६.५९ पर्यंत आहे. तर १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी नारळी पौर्णिमा साजरी केला जाणार. तर या सणा निमित्त प्रत्येक घरात नारळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यात नारळी भात, नारळाच्या वड्या अशा पदार्थांचा समावेश असतो.