भारतावर इ.स १७७० पासून इग्र्जांचे भारतावर राज्य होते.त्यांनतर भारतीय क्रांतीक्रारांणी दिलेल्या तीव्र लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळवून यंदाच्या १५ ऑगस्टला ७३ वर्ष पूर्ण होणार आहेत.त्यामुळे देशभरात उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का भारता सोबत आणखीन ४ देशांनाही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.
हि आहेत ती चार देश
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी भारतासह दक्षिण कोरिया, बहरीन, लिकटेंस्टीन आणि कांगो हे चार देश त्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात. तर दक्षिण कोरियांनी जपानकडून १९४५ साली, बहरीनने ब्रिटेनकडून १९७१ साली, लिकटेंस्टीन देशाने जर्मनीकडून १८६६ रोजी आणि कांगोनो फ्रान्सकडून १९६० रोजी स्वातंत्र्य मिळवले होते. त्यामुळे हे चारही देश १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.
अथक प्रयत्नाने मिळाले स्वातंत्र्य
भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य क्रांतीविराना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. मात्र तरीही अनेक चळवळी, आंदोलन करूनही इंग्रज १९४७ ला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते. मात्र, महात्मा गांधी यांनी छेडलेल्या ‘भारत छोडो आंदोलनाला कंटाळून १९४७ रोजी इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य दिले. यानंर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.