लोकप्रिय चीनी कंपनी Realme ने गेल्या महिन्यातच आपला Realme 3i हा स्मार्टफोन लाँच केला होता. तर या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी आज सेल आयोजित करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि Realme च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.
फीचर्स
- 6.22 इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले
- डायमंड-कट डिझाइनसह स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक तीन रंगांमध्ये उपलब्ध
- सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, तर AI ड्युअल कॅमेरा सेटअप यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा दोन मेगापिक्सलचा
- AI फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर
- 4,230 mAh क्षमतेची बॅटरी
ऑफर्स
- फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डद्वारे किंवा अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास पाच टक्के सवलत
- Realme च्या संकेतस्थळावरुन हा फोन खरेदी केल्यास रिलायंस जिओच्या ग्राहकांना विविध प्रकारे पाच हजार 300 रुपयांपर्यंतचा फायदा
- MobiKwik वापरणाऱ्यांना 10 टक्के ‘सुपरकॅश कॅशबॅक’ची ऑफरही
- जिओ आणि मोबिक्विकची ऑफर केवळ Realme च्या संकेतस्थळावरुन फोन खरेदी केल्यासच लागू असणार आहे.
किंमत
- 3GB रॅम+32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सात हजार 999 रुपये
- 4GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत नऊ हजार 999 रुपये