Ads
बातम्या

‘विराट’ विक्रमाधीष !

Virat kohli
डेस्क बातमीदार

दिनेश शिंदे : भारताचा कर्णधार विराट कोहलीने कालच्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीने त्याने असंख्य विक्रम मोडले आहेत. आजी-माजी क्रिकेटपटूच्या विक्रमासह त्याने काही स्वतचे विक्रम मोडले. वेस्ट इंडीज विरुद्ध काल त्याने १२० धावांची यशस्वी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने असंख्य विक्रमांना आपल्या नावे केले.

सचिनचा विक्रम मोडला

विराटने वेस्ट इंडिजविरुध्द १२० धावांची खेळी केली. या बलाढ्य धावसंख्येने त्यांने अनेक विक्रम आपल्या नावे केले. विराटचे हे वेस्ट इंडीज विरुध्द ८ वे तर करियरमधील ४२ वे शतक आहे. कोहलीने वनडे क्रिकेटमधील २२९ व्या डावात ४२ वे शतक झळकावले तर सचिनने त्याच्या वन डे कॅरियरमध्ये 406 व्या डावात ही कामगिरी केली होती. म्हणजेच वेगवान 42 वे शतक ठोकण्याच्या बाबतीत विराटने सचिनला मागे सोडले आहे.

‘दादा’लाही टाकले मागे

विराटनं सर्वात जास्त वनडे रन करण्यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. सौरव गांगुलीच्या नावावर ११ हजार ३६३ रन होते तर विराट कोहलीच्या नावे ११ हजार ४०६ रन आहेत. सर्वाधिक रन करण्यात सचिन अजूनही टॉपवर आहे. सचिननं ४६३ सामन्यात १८ हजार ४२६ रन बनवले होते.

 कर्णधार पदी सर्वाधिक शतक

वनडे क्रिकेटमध्ये कोणत्या तरी एका संघाविरोधात सर्वात जास्त शतक झळकवण्याची कामगिरी विराटनं केली आहे. विराटनं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉंटिंगचा रेकॉर्ड तोडला. वेस्ट इंडिज विरोधात कॅप्टन पदी असताना विराटनं ६ शतक बनवले. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त ५ शतक लगावले होते. तर, सचिन तेंडुलकरच्या नावावर संघाविरोधात सर्वात जास्त शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे.

स्वतःच्या नेतृत्वात २० शतके

विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील २० वे शतक स्वतःच्या नेतृत्वात बनवले.यापूर्वी धोनीच्या नेतृत्वात त्याने वनडे सामन्यात एकूण १९ शतके केली होती. सेहवागच्या नेतृत्वात विराटने दोन तर गंभीरच्या नेतृत्वात एक शतक झळकावले आहे.

जावेद मियाँदादचा विक्रम मोडला

विराट कोहली वेस्ट इंडीज विरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला बॅट्समन ठरला आहे. विराट पूर्वी तर विराटच्या आधी हा विक्रम जावेद मियांदाद यांच्या नावावर होता.विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केवळ 34 डावांमध्ये केली. तर जावेद मियांदादने त्याच्या वन डे करियामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 64 डावांमध्ये एकूण 1930 धावा केल्या होत्या.

वनडेत सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर – १८४२६
कुमार संगकारा – १४२३४
रिकी पॉटिंग – १३७०४
सनथ जयसूर्या – १३४३०
महेला जयवर्धने – १२६५०
इंजमाम उल-हक -११७३९
जॅक कॅलिस – ११५७९
विराट कोहली – ११४०६
सौरव गांगुली -११३६३

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: