माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना काल अचानक छातीत दुखून श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज, सकाळी उप राष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी रुग्णालयात जाऊन जेटली यांची भेट घेतली, यानंतर उप राष्ट्रपती सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेटली यांची प्रकृती स्थिर असून आता ते डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे समजत आहे. मात्र अद्याप त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.आहे.
Vice President Secretariat: The doctors informed the Vice President that Arun Jaitley is responding to the treatment and his condition is stable. https://t.co/U3s9bqhDWo
— ANI (@ANI) August 10, 2019
दरम्यान ,जेटली यांच्या रक्ताचा नमुना आणि यूरिन प्रोफाईल रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरंनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला . एम्सचे वरिष्ठ डॉक्टर आणि हृदयरोग तज्ज्ञ व्ही के बहल यांच्यासह अन्य पाच विभागांच्या वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक जेटली यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे.काही महिन्यांपूर्वीच जेटली यांच्यावर किडणी प्रत्यारोपण करण्यात आले होते. तर काल डॉक्टरांना त्यांच्या फुफ्फुसात पाणी आढळले होते. मात्र आता जेटली यांची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे.