गेल्या काही वर्षापासून जस जसा इंटरनेट स्पीड वाढत चाललाय, तस तसे पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढत चालली आहे. यामध्ये तरुणाई सर्वात पुढे आहे. मात्र या सवयीचा आपल्या आयुष्यावर किती दुष्परिणाम होतो याची माहिती आज सांगणार आहोत.
मेडिकल डेलीने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका रिसर्चमध्ये असे समोर आले आहे कि पॉर्न पाहिल्यानंतर dopamine हार्मोन अर्थात सेक्स ड्राइव्हला उत्तेजन मिळते. न्यूरो ट्रान्समीटरप्रमाणे हे काम करते. यामुळे व्यक्तिला आनंद मिळतो आणि शरीरसंबंधांकडे त्याचे मन वळते.
तसेच मेंदूच्या striatum भागावर पॉर्न पाहिल्यामुळे विपरित परिणाम होतो. striatum पॉर्न पाहिल्यामुळे आकुंचन पावते आणि काम करण्याची त्याची शक्तीही कमी होते. लोकांना प्रेरणा देण्याचे काम मेंदूचा हा भाग करतो.
जर एखादी व्यक्ती नियमित पॉर्न पाहते तर एक अशी वेळ येते तेव्हा त्याची सेक्ससंबंधी रुची कमी होते. या सवयीमुळे लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ पॉर्न पाहणारी युवा पिढी एन्जॉय करू शकत नाही. पार्टनरसोबतचे अशांचे संबंधही फार चांगले राहू शकत नाहीत.त्यामुळे या सवयीवर अंकुश न घातल्यास लग्नानंतर शारीरिक संबंधाचा आनंद घेणे कठीण जाऊ शकते.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी बातमीदार घेत नाही.